ठाणे (उपसंपादक प्रफुल्ल शेलार) । तहसील पोलीस ठाणे येथे आज (दिनांक २ जुलै) रोजी अडीच वाजण्याच्या सुमारास तक्रारदार महिला नामे फुलनदेवी शिवा लोहार राहणार संत्रा मार्केट, फुटपाथ वर हिने तिचा मुलगा नामे राहुल लोहार वय ७ वर्ष हा काल दिनांक दि.१ रोजी सायंकाळी सहा वाजताचे सुमारास मेयो हॉस्पिटल समोरन मोमीन पुरा येथे जातो असे सांगून गेला परंतु अद्याप पर्यंत घरी परत आला नाही
ही माहिती मिळाल्यानंतर तात्काळ डीबी पथक , मिसिंग पथक, पोलीस ठाण्यातील सर्व बीट मार्शल यांना पोलीस ठाण्यात बोलावून हरवलेल्या मुलाचा फोटो व त्याचे वर्णन याची माहिती दिली व सदरची माहिती तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष , नागपूर सिटी ग्रुप तसेच झोन ३ व वरिष्ठांना दिली. झोन ३ चे सर्व बीटमार्शल यांना मोमीनपुरा चौक येथे बोलावून सर्च ऑपरेशन राबविण्यात आले.
अवघ्या दीड तासाच्या आत सदर मुलाचा मोमीनपुरा चौक ते गरीब नवाज मज्जिदच्या दरम्यान गल्ली जवळ शोध घेऊन ताब्यात घेण्यात आले व त्यास सुखरूप त्याच्या आईचे ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी तहसील पोलीस ठाण्याचे डीबी पथक मिसिंग पथक तसेच अधिकारी व अंमलदार यांनी अत्यंत तत्परतेने व संवेदनशीलपणे काम करून हरवलेल्या सात वर्षीय मुलाचा अवघ्या दीड तासात शोध लावण्यात यशस्वी झालो.







