पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी तिबेट कॅम्पमधील विद्यार्थ्यांसोबत साजरा केला शाळेचा पहिला दिवस

tibet-school-gondia

नागपूर (विभागीय संपादक मिलिंद खेकाळे) । १९७३ साली चीनने तिबेट देश्यावर कब्जा केल्यानंतर तिथून स्थलांतर झालेल्या नागरिकांना भारत सरकार ने सहारा दिला. विस्थापित झालेल्या तिबेटियन नागरिकांचे २ कॅम्प गोंदिया जिल्ह्यातील केशोरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत आहेत. गेली ५० वर्ष हे तिबेटियन नागरिक गुण्या गोविंदाने या ठिकाणी राहत आहेत.

आज येथील तिबेटियन विद्यार्थ्यांच्या शाळेचा पहिला दिवस होता. गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, यांनी आपल्या कुटुंबासह या शाळेला भेट दिली. त्यावेळी त्यांच्यासोबत केशोरीचे ठाणेदार सोमनाथ कदम, सपोनि जोहेब शेख, पोलीस हवालदार दीपक खोटेले, राहुल चिचमलकर हे देखील उपस्थित होते.

या भेटीमध्ये निखिल पिंगळे, साहेबांनी विद्यार्थी, शिक्षक, नागरिक यांच्याशी सुसंवाद साधला. तसेच विद्यार्थ्यांना क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल, हॉलीबॉल, टेनिस या खेळाचे साहित्य भेट म्हणून दिले. विद्यार्थ्यांनी देखील तिबेटियन भाषेमध्ये गाणी म्हणून सर्वांचे मनोरंजन केले. निखिल पिंगळे यांच्या भेटीमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेला आनंद द्विगुणीत झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here