गुरुवर्य महाराज मेहकरतर्फे पायदळ दिंडी सोहळ्याला अल्पोपाहार व चहा

dindi-sohala

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी राहुल वाणी) । कै. सौ. लक्ष्मीबाई मोहिते बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी च्यावतीने मेहकर, जिल्हा बुलढाणा येथील वारकरी दिंडी साठी स्नान, चहा व अल्पोपाहाराची सोय करण्यात आली होती. संस्थेच्या प्रांगणात हा अल्पोपाहार व चहा वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

 

या दिंडीसाठी स्नानाची सोय उपलब्ध करून देण्यात येते तसेच चहा नाष्टा, अल्पोपाहार ही देण्यात येतो ही परंपरा कै. सौ. लक्ष्मीबाई मोहिते बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी यांच्यावतीने सामाजिक भावनेतून राबवली जाते.

 

संस्थेचा हा उपक्रम संस्थेच्या स्थापनेच्या पूर्वीपासून अविरतपणे चालू आहे. या वर्षी पायी दिंडीत जवळ जवळ १५० वारकरी सहभागी होते. या वेळेस संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य दिलीप मोहिते, सचिव कविता मोहिते व सर्व पदाधिकारी सदस्य व महिला सदस्य हजर होते कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहिल्या बद्दल कै. सौ. लक्ष्मीबाई मोहिते बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शीच्या पदाधिकाऱ्यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here