आषाढी एकादशीनिमित्त समाजसेविका सायरा मुल्ला यांचे वृध्दाश्रमात केळी वाटप

sahara-vrudhashram

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी राहुल वाणी) । आषाढी एकादशी निमित्त सामाजिक कार्य करत असलेल्या समाजसेविका सायरा मुल्ला यांनी उपळे दुमाला येथील सहारा वृध्दाश्रमास भेट देवुन फराळ केळी वाटप करुन केली आषाढी एकादशी साजरी केली.

 

 

बार्शी शहरातील समाजसेवा करत असेलेल्या सायरा मुल्ला यांनी आज त्यांचा बकरी ईद हा सण साजरा न करता त्यांनी आषाढी एकादशीचे औचीत्य साधुन उपळे दुमाला येथील सहारा वृध्दाश्रम येथे जावुन फराळ,फळे,केळी वृध्दाश्रमातील गरजु लोकांना वाटप केली.त्यामध्ये त्यांची घरचा परीवार उपस्थित होता.

 

 

तसेच त्यांची सून पण आज पंढरपूर येथे वारकरी सेवा करत होत्या. सामाजिक सलोख्याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे या सासु सुनाचं कार्य दिसून येते. जात धर्माच्या पलीकडे जाऊन या सासु सुना कार्य करत असल्याचे दिसून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here