पुणे (प्रतिनिधी सुहास गायकवाड) । दुबईहून पुण्यात आलेल्या एका महिलेने तिच्या गुप्तांगामध्ये तब्बल २० लाख ३० हजार रुपयांचे ४२३.४१ ग्रॅम सोने तस्करी करुन आणल्याचा प्रकार सीमा शुल्क विभागाने (कस्टम) उघडकीस आणला आहे. याप्रकरणी ४१ वर्षीय महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.१ जुलै) एक प्रवासी महिला स्पाईसजेट या विमानाने दुबई ते पुणे असा प्रवास करत होती. पुणे विमानतळावर आल्यानंतर तपासणी करणाऱ्या कस्टमच्या अधिकाऱ्यांना तिची हालचाल संशयास्पद वाटल्याने, तसेच तपासणीसाठी असलेल्या ग्रीन चॅनेलमधून ती जेव्हा गेली तेव्हा तिच्या शरीरात तिने काही तरी लपवून आणल्याचे त्यांना आढळून आले.
कस्टम अधिकाऱ्यांनी तिच्याकडे सखोल चौकशी केली असता तिने तेथील महिला अधिकाऱ्यांना गुप्तांगात लपवून आणलेल्या सोन्याची पेस्ट असलेल्या कॅप्सूल काढून दिल्या. अधिक तपासणीसाठी तिला रूग्णालयात नेऊन तिची तपासणी करण्यात आली.







