दोंडाईचा येथे स्वातंत्र्यदिनाच्या औचित्य साधून महिला व पुरुष गटाची स्थापना

दोंडाईचा (संतोष कोळी) – येथील अखिल भारतीय कोळी / कोरी समाज धुळे जिल्हा शाखा तर्फे १५ ऑगस्ट दिनाचे औचित्य साधून महिला व पुरुष बचत गटाची स्थापना करण्यात येणार आहे तसेच जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. दोंडाईचा येथील दादासाहेब रावल स्टेडियम गाडा क्रमांक 15 येथे अखिल भारतीय युवा कोळी/कोरी समाज दिल्ली शाखा धुळे जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन अप्पर तहसीलदार सुदाम महाजन , माजी नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र देशमुख,प्रमुख अतिथी प्रदेश अध्यक्ष संजय शिरसाठ ,डॉक्टर राजेंद्र सावळे , नगरसेवक विजुभाऊ मराठे,नगरसेवक कृष्णा नगराळे,पंचायत समिती सदस्य मनोहर देवरे, ग्रामसेवक पंकज चोहान,adv. संतोष भोई,adv बबलू रॉय, प्रशांत सोनार, डॉक्टर बी एल जैन, डॉक्टर ललित कुमार चंद्रे, एडवोकेट तुषार इशि,कैलास पाटील,समाज सेवक दिपक गायकवाड , भूमिहीन असंघटित कामगार संघटना चे जिल्हाध्यक्ष नवनीत बागले,ओंकार पगारे , दोंडाईचा मराठी पत्रकार असोशियन सल्लागार प्राध्यापक , रवींद्र टाटिया सर चेतन शिरसाट, संजय पाटील ,हेमंत निकम यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रम 15 ऑगस्ट दिना निमित्ताने भारत मातेचे पूजन यावेळेस करण्यात येईल .त्याच बरोबर धुळे जिल्हा पदाधिकारी यांना जिल्हा अध्यक्ष संतोष कोळी पत्रकार यांच्या उपस्थितीत ओळखपत्र वाटप तसेच महिला व पुरुष बचत गटाची स्थापना करण्यात येणार आहे. या गटाचे वैशिष्ट समाजातील गरजवंत लोकांना दोन हजार पासून तर दहा हजार पर्यंत आर्थिक मदत सहकार्य या गटाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे .तरी समाज बांधवांनी जिल्हा अध्यक्ष पत्रकार संतोष कोळी यांच्याकडे संपर्क करण्यात यावा असे आव्हान जिल्हा संघटक अनिल जाधव,दोंडाईचा शहर अध्यक्ष मयूर कोळी, आप्पा कोळी सर , जिल्हा कार्याध्यक्ष विनोद कोळी, महेंद्र कोळी, छोटू भाऊ सैंदाणे ,चेतन कोळी, राकेश महाले, ईश्वर ईशी ,शरद सावळे, जितेंद्र ईशी ,इत्यादींनी केलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here