चोपडा (तालुका प्रतिनिधी संदिप ओली) – महाराष्ट शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिती चोपडा तालुका शाखे तर्फे संस्थापक अध्यक्ष प्रेमकुमार अहिरे यांच्या आदेशाने व निसर्ग मित्र समिती चोपडा तालुकाध्यक्ष दादासाहेब वासुदेव महाजन यांच्या मार्गदर्शनाने व चोपडा तालुका सचिव प्रा.दिनेश बाविस्कर सर यांच्या उपस्थितीत चोपडा तालुक्यातील कोविड 19 या महामारीच्या काळात महामारी पसरू नये यासाठी विशेष मेहनत घेणाऱ्या *कोरोना योद्धांचा सन्मान पत्र देऊन सन्मान करण्यात आला.
यात सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी कांग्रेसचे चोपडा तालुकाध्यक्ष सन्माननीय राजेंद्र गंगाधर पाटील ,प्रा.अनिल जिजाबराव पाटील उपसरपंच लासूर ता.चोपडा,गणपुर येथील दै.सकाळचे पत्रकार अँडव्होकेट बाळकृष्ण पाटील ,चौगाव येथील सामाजिक कार्यकर्ते पत्रकार संदिप भाऊ कोळी ,चोपडा येथील सर्प मित्र कुशल अग्रवाल या कोरोना योद्धांचा सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी निसर्ग मित्र समितीचे चोपडा तालुकाध्यक्ष वासुदेव महाजन, तालुका संघटक कांतिलाल पाटील,तालुका सचिव प्रा.दिनेश बाविस्कर ,तालुका संपर्क प्रमुख विश्राम तेले आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निसर्ग-मित्र समिती चोपडा चे संपर्क-प्रमुख वृक्ष प्रेमीं तथा सामाजिक कार्यकर्ते विश्राम तेले,सह तालुक्याचे पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले,अशी माहिती तालुकाध्यक्ष वासुदेव महाजन व सचिव दिनेश बाविस्कर यांनी पत्रकान्वये दिली आहे,







