पुणे (सहसंपादक विठ्ठल घुमरे) : पुणे शहर सध्या व्यसनांचे मु्ख्य केंद्र बनू पाहात आहे या विळख्यात निष्पाप व कोवळी शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी देशातील मुले व्यसनाकडे आकार्षित होत आहेत, याप्रकारे जर या देशाचे उद्याचे भविष्य उध्वस्त झाले तर ते नुकसान देशाला परवडणारे नाही. हा सामाजिक धोका लक्षात घेऊन पुणे शहरातील विद्यांर्थांना या विषयाशी संबंधित जनजागृती करून त्यांना व्यसनांपासून परावृत होण्यास मदत व्हावी हा विचार प्रत्यक्षात अंमलात यावा यासाठी पुणे शहर युवासेना यांचेकडून मा. शिक्षण उपसंचालक व मा. पोलीस आयुक्त पुणे शहर यांना दि.२१/१२/२०२२ रोजी युवासेना उपशहर प्रमुख शिवप्रसाद जठार यांच्या कडून पत्र देण्यात आले होते.
दोन्ही शासकीय विभागांनी याचे गांभीर्य विचारात घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्यात तत्परता दाखवली व सेशन घेण्यास सुरुवात केली, या बद्दल त्यांना प्रथम धन्यवाद त्यांनी जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिना निमित्त विविध विभागांतील शाळांमध्ये या विषयाशी संबंधित तज्ञाकडून विद्यार्थांना मार्गदर्शन केले व वेळीच या सामाजिक धोक्यास पायबंद करण्यास सुरवात केली आहे. पोलीस आयुक्त कार्यालय कडून पुणे शहरात असलेल्या सर्व परिमंडळ कार्यालयाला सेशन राबवण्यात बाबत आदेश देण्यात आले आहेत, शिक्षण उप संचालक यांना प्रत्येक माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागात सेशन राबवण्यात बाबत पोलीस आयुक्तांना कडून सुचवण्यात आले आहे.
या वेळी युवासेना उपशहर प्रमुख शिवप्रसाद जठार यांच्या कडून पत्र देण्यात आले, या वेळी, युवासेना शहर प्रमुख सनी गवते , अक्षय माळकर ,सोनू पाटील , प्रसाद बाबर , रमेश क्षीरसागर ,प्रशांत पहिलवान , अमर कामठे , केतन झगडे, कार्तिक शेडगे, विवेक वाडेकर, प्रतीक जरे , सचिन पगारिया , श्रीकांत खांदवे , अजिंक्य अहीरेकर ,निखिल दाभाडे , विश्वजीत चोहान, अंकित अहिरे , प्रविण गायकवाड , आकाश अडेप , आकाश खांदवे , अनिल गावडे , दिनकर सर्जे , आदिनाथ फडतरे , शुभम वंजारे, उमेश दगडे , अभिनंदन वाघमारे , सलमान शेख , आमिर शेख , रोहन भांडे , इत्यादी उपस्थित होते.







