ग्राहक समितीकडून ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्थेचा मानपत्र देऊन सन्मान

only-samajseva

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी राहुल वाणी) : साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंती चे औचित्य साधून ग्राहक समिती महाराष्ट्र यांच्या वतीने मु.पो.घारी ता.बाशी॔ मा.श्री.दशरथ उकिरडे सर यांच्या विचारातून बाशी॔ तालुक्यातील सामाजिक कार्य करीत असलेल्या संस्थेस मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

 

rahul-wani-manpatraग्राहक समिती महाराष्ट्र आदर्श पुरस्कार वितरण समारंभ सन २०२३-२०२४ मानपत्र सोहळा ग्राम पंचायत समिती घारी ता.बाशी॔ येथे मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून कॉम्रेट मा.प्रविण मस्तूद सर होते त्यांनी अत्यंत महत्त्वाचे विचार शाहीर अण्णाभाऊ साठे सांगितले आयोजक यांनी प्रथम जानिव फाउंडेशन बाशी॔ या चे अध्यक्ष तुळशीराम मस्के सर व त्यांच्या सर्व टीमचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

 

बाशी॔त आपत्कालीन परिस्थितीत लोकांचे प्राण वाचविण्यासाठी प्रयत्न करतात ती संस्था भगवंत सेना दल या संस्थेचे अध्यक्ष धिरज शेळके व त्यांची टीमला मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्था बाशी॔ या संस्थेने तालुक्यातील तळागाळातील लोकांपर्यंत जाऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे त्यामुळे संस्थेस मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

 

ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्थाचे सचिव विजय कुमार दिवाणजी सर यांनी सन्मान स्विकारला त्या वेळी संस्थेचे सहसचिव नागनाथ सोनवणे, तालुका अध्यक्ष अजय तिवारी, खजिनदार माणकोजी ताकभाते, बालाजी घावटे हे उपस्थित होते घारीचे प्रथम नागरिक जगदाळे साहेब, प्रशांत जगदाळे, पाटील सर , नंदकुमार काशीद गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते मा.श्री.तानाजी गुंड , कार्यक्रमांचे आयोजन, सुत्रसंचलन,व आभार मा.उपसरपंच श्री.दशरथ उकिरडे सर यांनी केले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र पूर्वक अभिवादन करण्यात आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here