मुक्ताईनगर येथील शासकीय अल्पसंख्यांक पॉलिटेक्निक कॉलेजच्या शैक्षणिक वर्षास सुरुवात करावी

nathabhau

आ .एकनाथराव खडसे यांची विधानपरिषद मध्ये मागणी

जळगाव (कार्यकारी संपादक समाधान पाटील) : अल्पसंख्यांक समाज हा अनुभवाच्या जोरावर विविध तांत्रिक कामे करत असतो हा अल्पसंख्यांक समाज शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावा त्याच्या अनुभवाला तंत्र शिक्षणाची जोड मिळून समाजातील तरुण उच्च पदावर पोहचून समाजाचा विकास व्हावा यासाठी आ एकनाथराव खडसे हे अल्पसंख्यांक विकास मंत्री असताना त्यांनी मुक्ताईनगर तालुक्यात सालबर्डी येथे अल्पसंख्यांक समाजासाठी शासकीय तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) महाविद्यालय मंजुर केले होते त्याचे काम २०१८ पासून सुरू असून गेले अनेक दिवसा पासून हे काम रेंगाळले आहे आज बुधवार ला आ.एकनाथराव खडसे यांनी विधनपरिषदेत तारांकित प्रश्न विचारून हे काम ज्या अडचणीमुळे प्रलंबित आहेत त्या अडचणी सोडवून चालू शैक्षणिक वर्षा पासून अल्पसंख्यांक समाजासाठी असणारे हे पॉलिटेक्निक महाविद्यालय सुरू करण्याची मागणी केली

 

यावेळी आ. एकनाथराव खडसे म्हणाले सालबर्डी शिवार मुक्ताईनगर येथील शासकीय अल्पसंख्यांक तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे बांधकामास सन २०१८ मध्ये सुरुवात करण्यात आली असून इमारतीच्या काही भागाच्या बांधकामासाठी व परिसरातील नागरिकांसाठी रस्ता यासाठी जागा उपलब्ध नसल्याने बांधकामाचा वेग मंदावला आहे असे असल्यास, सदर महाविद्यालयासाठी जागा उपलब्ध होण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच शासकीय अधिकाऱ्यांद्वारे भूसंपादनाची कार्यवाही पूर्ण केल्यामुळे सद्य:स्थितीत महाविद्यालयाचे काम पूर्णत्वास आलेले आहे,काय? असे असल्यास, मुक्ताईनगर येथील शासकीय अल्पसंख्यांक तंत्रनिकेतन महाविद्यालय सुरु करून चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश प्रकिया राबविण्यात यावी अशी मागणी आ. एकनाथराव खडसे यांनी केली.

 

या प्रश्नाला अल्पसंख्यांक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी उत्तर दिले. उत्तर देतांना ते म्हणाले सालबर्डी शिवार मुक्ताईनगर येथील शासकीय अल्पसंख्यांक तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) महाविद्यालयाचे बांधकामास सन २०१८ मध्ये सुरुवात करण्यात आली असून महाविद्यालयाच्या इमारतीच्या काही भागाच्या बांधकामासाठी व परिसरातील नागरिकांसाठी रस्ता यासाठी जागा उपलब्ध नसल्याने बांधकामाचा वेग मंदावला आहे त्यासाठी आवश्यक जागेची भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने सदर तंत्रनिकेत इमारतीचे बांधकाम अपूर्ण आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्या मानंकानुसार प्रथम वर्षासाठी इमारतींचे बांधकाम परिपूर्ण अवस्थेत असणे आवश्यक आहे. सदर तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम अपूर्ण अवस्थेत असल्याने, चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश प्रक्रिया सुरु करणे शक्य नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here