युवा कवी संदीप राठोड यांच्या कवितासंग्रहाला बंधुता काव्यप्रतिभा पुरस्कार प्रदान

kavi-sandeep-rathod

अहमदनगर (जिल्हा क्राइम रिपोर्टर प्रविण वराळ) : निघोज येथील युवा कवी संदीप राठोड लिखित व पारनेर साहित्य साधना मंच प्रकाशित ‘भूक छळते तेव्हा…’ कवितासंग्रहाला बुधवार दिनांक ९ ऑगस्ट रोजी बंधुता काव्यप्रतिभा पुरस्काराने गौरविण्यात आले. राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद व रयत शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिदिनानिमित्त दादा पाटील महाविद्यालय कर्जत, जि.अहमदनगर येथे दहावे विद्यार्थी आणि शिक्षक साहित्य संमेलन पार पडले.

 

संमेलनाध्यक्ष डॉ.संजय नगरकर, स्वागताध्यक्ष मा.राजेंद्र फाळके, उद्घाटक प्रा.शंकर आथरे, ज्येष्ठ विचारवंत श्रीपाल सबनीस, बंधुताचार्य प्रकाश रोकडे, प्रसिद्ध कवी चंद्रकांतदादा वानखेडे, डॉ.अरुण आंधळे, ज्येष्ठ कवयित्री संगीता झिंजुरके या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते भूक छळते तेव्हा… या साहित्यकृतीला ‘बंधुता काव्यप्रतिभा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

 

भूक छळते तेव्हा हा कवी संदीप राठोड यांचा पहिलाच कवितासंग्रह असून अल्पावधितच या कवितासंग्रहाला राज्यस्तरीय सहा पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे. याआधी शब्दवेल कबीर सन्मान पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे वाड्मय पुरस्कार, बालाजी सरोज भावकाव्य साहित्य पुरस्कार, सावित्रिबाई फुले साहित्य भूषण पुरस्कार, मासिक सारांश साहित्य पुरस्कार अशा विविध पुरस्कार प्राप्त कवितासंग्रहाला नुकताच बंधुता साहित्य परिषद व रयत शिक्षण संस्थेचा बंधुता काव्यप्रतिभा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 

यावेळी कवी संदीप राठोड यांनी सांगीतले की, हा सन्मान कवितेचा असून पुढील साहित्यिक वाटचालीस बळ देणारा आहे. तसेच लेखणीची जबाबदारी वाढवणारा आहे. यावेळी कवी संदीप राठोड यांनी राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद व रयत शिक्षण संस्थेचे आभार मानले. कवी संदीप राठोड यांच्या कवितासंग्रहाला पुरस्कार प्रदान होताच त्यांचा मित्रपरिवार, पारनेर साहित्य साधना मंच व विविध स्तरावरून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here