चाकुचा धाक दाखवून मेहरुण तलाव परिसरात मोबाईल व रोख रक्कम लुटली

midc-police-arrested

जळगाव (प्रतिनिधी शहीद खान) : शहरातील मेहरुण तलाव परिसरात असलेल्या एका ठिकाणी रिक्षातुन नेत रिक्षा चालकासह एकाने तरुणाला चाकूचा धाक दाखवून खिशातून पैशांसह मोबाईल लुटण्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव शहरातील साईनगर परिसरातील रहिवासी असलेल्या जितेंद्र रामकिशन मोर्या (वय-२२) हा तरुण दि. १७ जुन रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास जळगाव रेल्वे स्थानकावरून एका अनोळखी रिक्षात बसत घरी जाण्यासाठी निघाला असता त्याला अनोळखी रिक्षात चालकाने रास्ता बदलुन या ठिकाणी न नेता मेहरुण तलावाच्या जंगलात नेऊन तु जर पोलिसांना तक्रार करशील तर तुला जीवन ठेवणार नाही असे बोलून मागे बसलेल्या तरुणांनी चाकुचा धाक दाखवून फिर्यादच्या खिशातून १५ हजार किंमतीचा ओप्पोचा मोबाईल व १००० रु लुटलेची घटना घडली आहे.

या प्रकरणी फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अतुल वंजारी, पुढील तपास करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here