जळगाव (प्रतिनिधी शाहिद खान) : शहरातील एमआयडीसी परिसरात जुन्या भांडणातून झालेल्या वादातून एक बाल केल्याची घटना सकाळी ११ वाजता सुमारास घडली असून या प्रकरणी स्वप्निल उर्फ सोपान चंदूसिंग मोरे (वय-२५) रा. गजानन पार्क कुसुंबा ता. जळगाव, याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या संशयताला केवळ अर्ध्याच तासात मन्यारखेडा फाट्या जवळून एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेत मुद्देमाल बंदूक व काडतुसह अटक केली आहे. संशयितालख लागलेच अटक करण्यात यश आल्यामुळे एमआयडीसी पोलिसांचे पोलीस अधिक्षकांसह नागरिकांनी कौतुक केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कुसुंबा, येथील रहिवासी आकाश प्रेम तंवर (वय-२४) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तो गुरुवारी १० ऑगस्ट रोजी सकाळी १०:३० वाजता कंपनीत कामावर जात होता. एमआयडीसी सेक्टर नंबर व्ही येथील प्रभात पॉलिमर कंपनी जवळ जात असताना आकाश तंवर याच्या मित्र रोहित पवार, तसेच अनिल सैनदाणे, समाधान पाटील, भरत चांदवडे, धीरज पवार हे गप्पा करीत उभे असताना त्या ठिकाणी संशयित आरोपी स्वप्निल उर्फ सोपान चंदूसिंग मोरे, हा त्याचे मित्र विपुल पाटील व अजय पाटील (दोन्ही रा. कुसुंबा) यांच्यासोबत आला. स्वप्निल आकाश तंवर याला म्हणाला की, बब्या कुठे आहे. त्याने तुझ्या सांगण्यावरून मला मारले आहे. आज तुमच्या दोघांच्या गेम करतो. त्यावर आकाश तंवर याने बाब्याबाबत मला काही माहिती नाही असे सांगितले.
मात्र त्याचे वाईट वाटून स्वप्निल मोरे यांनी कमरेला लावलेला बंदूक काढून आकाश तंवर याच्यावर रोखला. आधी तुझे व नंतर बब्याचे काम करतो असे स्वप्निल मोरे म्हणाला. त्यावेळी त्यांनी गोळी झाडली. पण आकाशाने खाली वाकून गोळीच्या नियम चुकवला आणि रस्त्यात पडलेल्या दगड उचलून संशयित स्वप्निल मोरे यांच्या दिशेने फेकला. त्यानंतर स्वप्निल मोरे यांनी पुन्हा दुसरी गोळी आकाश तंवर याच्यावर फायर केली. ही गोळी आकाशाच्या अंगाच्या जवळून गेली. नंतर पुन्हा तिसरी गोळी जळत असताना त्याचे पिस्तूल अडकले. त्यामुळे घाबरून आकाश याने पुन्हा दुसरा दगड उचलून त्याच्यावर फेकत असताना स्वप्निल मोरे आकाश याच्या जवळ गेला. डोक्यावर पिस्तुलाने मारले नंतर आकाशाच्या हातात दगड सापडल्याने तो पळून गेला.
ही घटना आकाश तंवरच्या मित्रांनी पाहिली संशयित स्वप्निल मोरे यांच्यासोबत आलेले विपुल पाटील, व अजय पाटील हे लगेच मोटरसायकल घेऊन त्याच्या मागे गेले आणि त्याला दुचाकी वर बसून प्रभा पॉलिमर येथून निघून गेले. त्यानंतर आकाश तंवर या नेत्याच्या काका राजेश पवार यांना घेऊन एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठले. त्या ठिकाणी त्याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, डी.वाय.एस.पी संदीप गावित, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी प्रत्यक्ष भेट दिली. संशयित आरोपींच्या शोधार्थ पोलीस रवाना झाले आहेत.
स्वप्निल सोपानाने तीन दिवसांपूर्वीच १६ हजार रुपयात गावठी कट्टा आणि तीन जीवन काडतुस खरेदी केल्याची माहिती समोर येत आहे. गोळीबार करणारा स्वप्निल हा मन्यारखेडा येथे आहे. माहिती मिळाल्यावर लागलीच मन्यारखेडा येथून गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक दिपक जगदाळे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोना सुधीर साळवे, इम्रान सैय्यद, सचिन मुंढे, योगेश बारी, किशोर पाटील, सचिन पाटील, मुदस्सर काझी, मुकेश पाटील छगन तायडे, किरण पाटील, साईनाथ मुंढे, महिला पोना निलोफर सैय्यद, अशाने जाऊन त्याला मन्यारखेडा फाट्या जवळून ताब्यात घेतले.
त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले असं व त्याचे अंगझडतीमध्ये त्याने गुन्हयात वापरलेले २० हजार रुपये किंमतीचा एक गावठी कट्टा आणि एक जीवन काडतुस दिलेले आहे. त्याला अटक करण्यात आली त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असून गुन्ह्याच्या तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, योगेश बारी हे करीत आहे.







