सोलापूर (जिल्हा क्राईम रिपोर्टर विनोद लोखंडे) : माळशिरस तालुक्यातील बचेरी येथील व पिलीव ग्रामपंचायत याठिकाणी ग्रामविकास अधिकारी या पदावर कार्यरत असणारे अनिल लक्ष्मण सावळजकर यांची नुकतीच माळशिरस पंचायत समिती याठिकाणी कृषी विस्तार अधिकारी पदी पदोन्नती झाली आहे.
अनिल लक्ष्मण सावळजकर सुरुवातीला ग्रामसेवक म्हणून व नंतर ग्रामविकास अधिकारी म्हणुन ३३ वर्ष सेवा बजावली आहे. यामध्ये शेंडेचिंच , सुळेवाडी , पिलीव , झिंजेवस्ती , तांदुळवाडी , यशवंतनगर , मळोली , त्यांनी सेवा बजावली आहे शिस्तप्रिय व प्रामाणीकपणे त्यांनी काम पाहीले आहे . अनिल सावळजकर यांच्या पदोन्नती बद्दल समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे .







