डॉक्टर सुनिल कदम यांना मिळाला लंडन येथील बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार

suil-kadam

अहमदनगर (जिल्हा क्राइम रिपोर्टर प्रविण वराळ) : डॉक्टर सुनिल कदम यांना लंडन येथील बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल त्यांचा निघोज ग्रामस्थ,निघोज ग्रामपंचायत व संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन, पारनेर तालुका पत्रकार संघ यांच्या वतीने मुंबई बॅंकेचे अधिकारी व संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे मार्गदर्शक सुनिल दादा पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष व निघोज – आळकुटी जिल्हा परिषद गटाचे सर्वेसर्वा सचिन वराळ पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मंगेशशेठ लाळगे, ग्रामपंचायतचे माजी सदस्य भिमदादा लामखडे, अल्पसंख्याक समाजाचे नेते व प्रभाग क्रमांक चारमध्ये विकासकामे करणारे कार्यकर्ते अस्लमभाई इनामदार,पारनेर तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष दत्ताजी उनवणे, उपाध्यक्ष भास्करराव कवाद साहेब यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

लंडन येथील बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल डॉक्टर सुनिल कदम यांचे संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन, निघोज ग्रुप ग्रामपंचायत व ग्रामस्थ,पारनेर तालुका पत्रकार संघ यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here