सोलापूर (जिल्हा क्राईम रिपोर्टर विनोद लोखंडे) : महाराष्ट्र राज्य बहुजन ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष किरण साठे यांनी दिनांक ४ ऑगस्ट रोजी पिलीव ते माळशिरस एसटी बस सुरू करावे असे निवेदन आगार व्यवस्थापक रा.प अकलूज यांच्याकडे देण्यात आले होते.
या निवेदनाच्या अनुषंगाने पिलीव ते माळशिरस बस सेवा आज रोजी सुरू करण्यात आली अनेक वर्ष बंद झालेली एसटी बससेवा किरण साठे यांनी पाठपुरावा करून पिलीव चांदापुरी तरंगफळ मोठेवाडी माळशिरस अकलूज एसटी बस सुरू केली आहे. पिलीव पंचक्रोशीतील सर्व लोकांनी ह्या एसटी बसचा लाभ घ्यायचा आहे ही विनंती यावेळी किरण साठे यांनी केली.
बहुजन ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष किरण साठे यांचा राष्ट्रवादीचे नेत्याकडून सत्कार करण्यात आला व त्यांचे अभिनंदन करण्यात आले यावेळी पिलीव परिसरातील मान्यवर व सर्व नागरी आघाडी पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते व राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते







