सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी राहुल वाणी) : भैरवनाथ शिक्षण संस्था संचलित संतोष गुळमिरे प्राथमिक विद्यामंदिर बार्शी या शाळेचे सहशिक्षक व ओन्ली समाज सेवा संस्थेचे तालूका उपाध्यक्ष गणेश नारायण नारायण यांना यंदाचा तेजस फाउंडेशन नाशिक यांचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला आहे.
हा पुरस्कार सोहळा संभाजीनगर या ठिकाणी १३ ऑगस्टला होता. गणेश कदम नेहमी सामाजिक कार्यात सहभागी असतात शाळा पाहुन हे समाज कार्यासाठी वेळ देतात. ते बार्शीतील अनेक संस्था संघटनामध्ये कार्य करतात. तसेच शाळेत देखील नवनवीन उपक्रम राबवत मुलांना शाळेत गोडी लावुन मलांमध्ये बदल करण्यासाठी प्रयत्नशील असतात .शाळेत चांगल्या पध्दतीने कार्य करतात त्यांचे हे सामाजिक व शैक्षणिक कार्य पाहुन तेजस फाउंडेशन नाशिक यांचा पुरस्कार देण्यात आला.
गणेश कदम यांना आजपर्यत अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत यासाठी त्यांना अनेक सामाजिक संस्थेतील लोकांचे सहकार्य मिळत असते. हा पुरस्कार मिळाल्यावर अनेक संस्था, संघटना यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.







