ठाणे (जिल्हा प्रतिनिधी एकनाथ पाटील) : भिवंडी येथील राज्य उत्पादन शुल्कच्या कार्यालयात पंचांचा हैदोस येथील कारवाईसाठी लागणारे पंच सागर पाटील,नरेंद्र लाडे,व प्रकाश कुंभार उर्फ पक्या ह्यांनी संपूर्ण तालुक्यात व भिवंडी राज्य उत्पादन शुल्कची हद्द जीथपर्यंत आहे तिथं पर्यंत हफ्ते वसुली ह्यांच्या मार्फत निरीक्षक एस वाय गायकवाड करून घेत आहेत.
प्रत्येक बार/ वाईनशॉप /बिअर शॉप/अवैध ढाबे व गावठी हातभट्टी /दमण व गोवाची दारू विक्री करणारे ह्यांच्याकडून वसुलीचे काम ही तिकडी करत आहेत प्रत्येक वाईनशॉप मधून २०००/-प्रति माह बार मधून १५००-२००० गावठी दारू बनवणाऱ्यांकडून १००००-१५००० इतका हफ्ता वसूल केला जातो,मुळात पंचाचे काम फक्त कारवाई पुरते असतात पण हे पंच राज्य उत्पादन शुल्कच्या कार्यालयात थेट अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या खुर्चीत बसून असे भासवतात कि हेच खरे अधिकारी आज पर्यंत भिवंडी कार्यालयात काम करणारे खरे अधिकारी कर्मचारी कोणीच पाहिले नाही,ह्या तिघांना पण निरीक्षक एस वाय गायकवाड ह्यांच्याकडून मोठा अभय दिला जात असल्याने हे इतके माजलेत कि थेट कार्यालयात ठाण मांडून अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या खुर्चीत बसतात.
प्रकाश कुंभार उर्फ पक्या ह्याचे खरे काम कार्यालयातले टॉयलेट साफ करण्याचे आहे पण पक्या हा गावठी दारू व ताडी विक्री करणाऱ्यांकडून हफ्ता वसुलीचे काम करतो आणि नरेंद्र लाडे व सागर पाटील हे बार-वाईनशॉप-लेडीस बार-दमन गोव्याची दारू विक्री करणारे व अवैध ढाबेवाले ह्यांच्याकडून वसुलीचे काम निरीक्षक गायकवाड़ ह्यांच्यासाठी करत आहेत बिना एखाद्या अधिकाऱयांच्या मर्जी शिवाय कोणी कार्यालयात शिरू शकत नाही मग हे तिघेही थेट अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या खुर्चीत बसतात ह्याला जवाबदार कोण ?
ह्यांची हिम्मत इतकी वाढली आहे कि उद्या हे एफ एल-३ परवाना पण स्वताच स्वतःच्या सही निशी देतील. सदर बाबतमाहीती व तक्रार आयुक्त राज्य उत्पादन शुल्क,महाराष्ट्र व पोलीस महासंचालक(अतिरिक्त कार्यभार), लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य. ह्यांच्या कडे करण्यात आली असून तात्काळ ह्या तिघांवर व ह्यांना अभय देणारे निरीक्षक एस वाय गायकवाड कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.







