नागपुर (प्रतिनिधी मनोज बाचले) – 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळण्याबाबत 26जून 2019 च्या अभ्यास समितीचा अहवाल प्रलंबित 10 जुलै 2020 चे राजपत्र रद्द करण्याबाबत शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्ष संगिता शिंदे यांनी विधानपरिषद विरोधी पक्ष नेते प्रविणजी दरेकर यांची मुंबई येथे भेट घेतली.
दि 13/08/2020 रोजी विरोधी पक्ष नेता विधानपरिषद प्रविणजी दरेकर साहेब यांना संगीताताई मुंबई येथे भेटल्या त्यांनी सांगितले की 2005 पूर्वीच्या नियुक्त 2005 नंतर 100 टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षकांची प्रशासनाच्या नकारात्मक भावनेतून जुनी पेन्शन शासनाने नाकारली,संघटनेने अनेक आंदोलने केलीत मागच्या वर्षी अन्नत्याग आंदोलनामुळे विधानपरिषद सभापती मा रामराजे निंबाळकर साहेब यांनी अभ्यास समिती स्थापन केली,परंतु या समितीच्या वारंवार तारखा बदलत गेल्या,अजूनही लेखी अहवाल न देता उपसचिव चारुशीला चौधरी या सांगतात अहवाल शासनाला पाठविला आहे,परंतु या बैठकीत काय मुद्दे मांडले,शिक्षक आमदारांचे मत विचारात घेतले की नाही,संघटनेला विचार मांडण्याची संधी का दिली नाही,ज्या संघटनेच्या अन्नत्याग आंदोलनानुसार ही समीती स्थापन करण्यात आली होती तर या संघटनेला आपले विचार अंडण्याची संधी का दिली नाही,अधिकारी कटकारस्थान करून 10 जुलै 2020 मध्ये अधिसूचना काढुन कायद्यामध्ये महाराष्ट्र खाजगी सेवा शर्ती नियमावली 1977 व अधिनियम 1981 मध्ये बदल करून 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजने पासून वंचित ठेवण्याचा घाट घालत आहे,कायदयमध्ये दि 10 जुलै 2020 मध्ये करण्यात येणारी दुरुस्ती ही 2005 पासून लागू करण्याची मनमानी कार्य तसेच अधीकारी वर्गाने या 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांवर केलेल्या अन्यायवर अंथरून घालण्याचा प्रयत्न हे निर्ढावलेले अधिकारी करत आहे.
हे सर्व ऐकल्यावर मा प्रविणजी दरेकर साहेबांनी शिक्षण मंत्री मा वर्षा ताई गायकवाड यांना त्वरित या विषयावर शिक्षण सचिव व शिक्षण विभागाचे अधिकारी तसेच शिक्षण संघर्ष संघटनेच्या पदाधिकारी व स्वतः श्री प्रवणजी दरेकर साहेब यांच्या उपस्थितीत बैठक लावण्यास लेखी पत्र दिले,लवकरच बैठक लावते असे शिक्षण मंत्री महोदयांनी सांगितले,या बैठकीत शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्ष संगीताताई शिंदे,दिलीप डोंगरे,शरद तिरमारे, संजय इघे, सुनील भोर,विकास दिवे,सचिन पगार, पेन्शन शिलेदार व शिक्षण संघर्ष संघटनेचे मार्गदर्शक नितीन जी गुडधे यांना आमंत्रित करण्यास सांगितले. जोपर्यंत यश मिळणार नाही तो पर्यंत मी लढत राहील, असा विश्वास ताईंनी व्यक्त केले.








