विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास हेच खरे शिक्षणाचे ध्येय : सपोनि दिपक पाटील

देवळा
खामखेडा ता देवळा येथील मविप्रच्या जनता विद्यालयात आयोजित विदयार्थी गुणगौरव समारंभ प्रसंगी उपस्थित तालुका संचालक विजय पगार ,सपोनि दीपक पाटील ,नानाजी मोरे आदी (छाया - सोमनाथ जगताप)

देवळा (महाराष्ट्र राज्य उपसंपादक कुबेर जाधव) : सर्वगुण संपन्न विद्यार्थी घडवून विद्यार्थ्याचा सर्वागीन विकास हेच खरे शिक्षणाचे ध्येय असून शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी ध्येयवेड होऊन प्रयत्न केले पाहिजे, तरच येणारी पिढी गावाचे नाव उज्वल करेल” असे प्रतिपादन सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक पाटील यांनी खामखेडा येथील मविप्रच्या जनता विद्यालयात आयोजित विदयार्थी गुणगौरव समारंभ प्रसंगी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका संचालक विजय पगार होते.

 

प्रास्ताविकात मुख्याध्यापक आर.जी.पानसरे यांनी विद्यार्थ्याच्या शैक्षणिक गुणवता वाढविण्यासाठी करीत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. तसेच मविप्र संचालक विजय पोपट पगार यांनी बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांनी शिक्षणातून आपल्या कुटुंबाचा व येणाऱ्या पिढीचा विकास होतो. यासाठी मविप्र च्या विविध शाळेतून आदर्श विद्यार्थी घडविले जात असल्याचे सांगितले.

 

देवळा तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत कुस्ती या क्रीडा प्रकारात जनता विद्यालय खामखेडा विद्यालयातील पाच विद्यार्थ्यांनी अंतिम स्पर्धा जिंकून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकविला व जिल्हा कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली. तर सात विद्यार्थी उपविजेते ठरले. या विद्यार्थ्यांना . संचालक विजय पगार व सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक पाटील यांच्या हस्ते मेडल देऊन सन्मानीत करण्यात आले.

 

तसेच ‘मी अधिकारी होणार’ या उपक्रमांतर्गत इंग्रजी शब्द पाठ करणाऱ्या विद्यार्थ्यांचा ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला.याप्रसंगी तालुका संचालक विजय पगार , पोलीस क्षेत्रात काम करीत असतांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करून अनेक अधिकारी घडविणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक पाटील , माजी विद्यार्थिनी वैष्णवी जिभाऊ बच्छाव हिची महाजेनको मध्ये कनिष्ठ अभियंता पदावर नियुक्ती झाल्याबद्दल तसेच क्रीडा शिक्षक लक्ष्मीकांत पाटील, उपक्रमशील शिक्षक बी. वाय.सोनवणे, आर. के. पाटील यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

 

यावेळी सरपंच वैभव पवार, उपसरपंच श्रावण बोरसे, शालेय समिती अध्यक्ष नानाजी मोरे, अभिनव समिती अध्यक्ष रामदास शेवाळे, मुख्याध्यापक आर.जी.पानसरे, अनुप शेवाळे, गणेश शेवाळे, प्रशांत शेवाळे, हरी शेवाळे, उषाताई बोरसे, संजय मोरे, दादाजी बोरसे, विजय सूर्यवंशी, राजेंद्र जाधव, गंगाधर शेवाळे, दिनकर आहेर, महेश शिरोरे, नामदेव बच्छाव, भास्कर वाघ तसेच पालक, ग्रामस्थ, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विदयार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन टी. टी. कोर, डी. बी. भामरे यांनी तर आभार प्रियंका कापडणीस यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here