जळगाव (मुख्य संपादक सुनिल पाटील) : आयुर्वेदाच्या सहाय्याने रुग्णांवर उपचार करणारे श्री शिव आयुर्वेद क्लिनिकतर्फे रविवार दि. ३ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी २ दरम्यान मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात सांध्यांचे व मणक्यांचे विकार, सर्व प्रकारची वातव्याधी, पचनासंबंधित व पित्ताच्या सर्व समस्या, त्वचा विकार व सौंदर्य विषयक समस्या, खूप दिवसांपासूनचा ताप, सर्दी व खोकला, हृदय व रक्तवाहिन्यांचे विकार, किडनीचे विकार, श्वसनाचे विकार, स्त्रियांचे आजार, वजन वाढणे व कमी करणे, कुरुप काढणे व मस काढणे यासह लेजर ॲक्युपंक्चर, पंचकर्म, साऊंड हिलींग, कपिंग, सुजोक थेरपी आदीं उपचार करण्यात येणार आहेत.
या शिबिरात डॉ.के.एन.पाटील, डॉ.पी.देशमुख, डॉ.प्रज्ञा देशमुख, डॉ.पंकज पाटील, डॉ.डी.एस.मुळे, डॉ.जी.एन.शेवाळे, डॉ.संतोष पांडे, डॉ.सोमवंशी आदी वैद्यकिय क्षेत्रातील डॉक्टर रुग्णांवर उपचार करणार आहेत. तरी शिवगोरक्ष योगपीठ संस्थान, नाशिक – ओझर (आग्रा महामार्गालगत), अमृतधाम, हनुमान नगर शेजारी, रुख्मिणी लॉन्ससमोर, नाशिक येथे होणाऱ्या या शिबिराचा रुग्णांनी लाभ घ्यावा व अधिक माहितीसाठी ९८५०५८६३२९ किंवा ८८८८८३२२९४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.







