बांगलादेशी घुसखोरांना विक्रोळी, टागोर नगर येथून शिताफीने अटक

vikroli-police

मुंबई (विशेष प्रतिनिधी अजयश्री) : मुंबई, नवी मुंबई यासारख्या गजबजलेल्या शहरात मुंबई पोलिसांसमोर घुसघोर बांगला देशी नागरिकांचे आव्हान उभे राहिले आहे. आता हे बांगलादेशी नागरिक मुंबईच्या उपनगरात अचैधपणे चोरी छुपे आश्रय घेत असल्याचे दिसून येत आहे.

विक्रोळी पोलीस ठाण्याच्या दहशतवाद विरोधी पथकास अश्याच अवैधपणे राहणाऱ्या बांगला देशी घुसखोरांचे वास्तव्य ग्रुप नंबर आठ, टागोर नगर येथे असल्याची माहिती मिळाली. विक्रोळी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक क्षीरसागर यांनी त्याची तात्काळ दखल घेत. विक्रोळी पोलीस ठाण्याचे दहशतवाद विरोधी पथकाचे स.पो.नि. श्री प्रकाश इंगळे यांच्यासह स.पो.फौ. तांबे, पो.ह. काटकर, पो.शि. शेलार, राजेंद्र पाटील यांनी टागोर नगर येथील अशोक नगर झोपडपट्टी पिंजून काढून दोन संशयास्पद तरुणांना शिताफीने ताब्यात घेतले. दिनांक ०४ सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळी ९:०० वाजता ही कारवाई करण्यात आली.

तपासाअंती असे उघड झाले की हे बांगलादेशी नागरिक कोणत्याही कागदपत्राशिवाय अवैध मार्गाने बांगलादेश सीमेवरून viroli-police-arrested-bangaladeshiभारतात प्रवेश केला व मुंबई येथील टागोर नगर परिसरात अनेक वर्षापासून बेकायदेशीरपणे वास्तव्य करत होते. या घुसखोरां विरोधात गु.र.क्रमांक 425/2023 कलम-3 सह 6 पारपत्र (भारतात प्रवेश) नियम 1950 सह परिच्छेद 3(1)(अ) परकीय नागरिक आदेश 1948 सह कलम 14 परकीय नागरिक कायदा 1948 च्या अनव्ये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहेत अशी माहिती विक्रोळी पोलीस ठाण्याचे दहशतवाद विरोधी पथकाचे स.पो.नि. श्री प्रकाश इंगळे यांनी दिली. सदर आरोपींची नावे अनुक्रमे रिपोन मुर्शद अली, वय 29 वर्षे, जिल्हा मैमनीसंघ, राज्य – ढाका, बांग्लादेश व आरोपी मो बिलाल मुस्ताक मिया हुसेन, वय 32 वर्ष जिल्हा कोमिला, राज्य – चट्टोग्राम, बांग्लादेश अशी आहेत.

विक्रोळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर हिरडेकर यांनी उपनगरातील व विक्रोळी परिसरातील नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणीही संशयास्पदरीत्या बेकायदेशीर वास्तव्यास असलेल्या व्यक्ती आढळून आल्यास व बांगलादेशी नागरिक असल्याची माहिती मिळाल्यास त्याची खबर पोलिसांना द्यावी. तसेच अश्या व्यक्तींना कुणीही कामावर ठेवू नये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here