करंजाळीजवळ बस-कारचा भीषण अपघात; दोन जागीच ठार

peth-accident

नाशिक (उपसंपादक इंजि. कुबेर जाधव) : नाशिक-पेठ-धरमपूर राष्ट्रीय महामार्गावर करंजाळीजवळ बस आणि कारचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक-पेठ-धरमपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ८४८ वर करंजाळी जवळील वळणावर पेठ आगाराची पेठ-पुणे बस क्र. एमएच ४० वाय ५९७४ व नाशिकहून गुजरातकडे जाणारी सनी कार क्र. जीजे o६ एफसी ३३३१ यांची दुपारी ४:०० वाजे दरम्यान समोरासमोर धडक झाली.

या अपघातात कारमधील सुरत येथील प्रवाशांपैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी तातडीने नाशिक येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रवाशांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here