डॉ.जे.डी.पवार विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्यावतीने मान्यवर व्यक्तींचा सन्मान व गौरव संपन्न

kuber-jadhav

नाशिक (उपसंपादक कुबेर जाधव) : आज दिनांक ९ संप्टेबर रोजी भउर तालुका देवळा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची विशेष सर्वसाधारण सभा अंत्यंत शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली, संस्थेचे अध्यक्ष दिपक पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संस्थेने गेल्या दहा वर्षांत केलेल्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला.

 

sanman-kuber-jadhavयावेळी देवळा तालुक्याचे भुमिपुत्र मुंबई मराठी पत्रकार संघाचे सदस्य कुबेर जाधव यांची नुकतीच बुलंद पोलिस टाइम्स मुंबई या साप्ताहिकाचे उपसंपादक पदी नियुक्ती झाली त्याबद्दल त्यांचा संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष दिपक पवार यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला, यावेळी विविध मान्यवर व्यक्तींचा सन्मान करण्यात आला,यात विद्युत कर्मचारी संघटनेचे सदस्य हिरामण पवार, सुरेश पाटील,दिना आपा् पवार, पंडित संपत निकम, विनोद देवरे, किशोर देवरे, संजय आहेर, सौ, आशालता अहिरराव,आदी सन्मानिय व्यक्तीचा गौरव करण्यात आला.

 

भउर गावातील प्रसिद्ध शिवमंदिरात संपन्न झालेल्या बैठकीत डॉ जे डी पवार विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून शेतकरी हितासाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती संस्थेचे मा, अध्यक्ष रा,पा,आहेर यांनी दिली , याप्रसंगी गुरूदत्त पब्लिक स्कूल मानुर, तसेच जिल्हा परिषद चे माजी क्रुषी सभापती शैलेश पवार,हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, त्यांच्या हस्ते विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला, तर संस्थेचे अध्यक्ष दिपक पवार यांनी आभार मानले, याप्रसंगी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष श्री प्रवीण पवार, सचिव गंगाधर पवार,सौ, नेहा पवार जिभाउ पवार, हिरामण पवार, सुनील पवार, भास्कर पवार, आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here