नागपुरात दुध भेसळ करणाऱ्या ९ जणांवर कारवाई

milk-milavat

नागपूर (प्रतिनिधी मिलिंद खेकाळे) : सणांचे दिवस जवळ आले की, अधिक कमाईच्या नादात दुध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ करत नागरिकांच्या जिवाशी खेळ करण्याचे प्रकार वाढतात. अशी भेसळ करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात राज्य सरकारनेही कारवाईचा बडगा उगारला असून, या कारवाईतंर्गत नागपूर जिल्ह्यात भेसळ करणाऱ्या ९ जणांवर कारवाई करण्यात आली.

 

याबाबत सविस्तर अशी की, सणासुदीच्या काळात नागरिकांना शुद्ध दूध आणि दुधापासून तयार केलेले पदार्थ मिळावेत या उद्देशाने राज्य शासनाची प्रत्येक जिल्ह्यात दूध भेसळ करणाऱ्यांवर धडक तपासणी मोहीम सुरू केली आहे. याच तपासणीदरम्यान नागपूर जिल्ह्यात वेगवेगळ्या ९ डेअरींमध्ये भेसळयुक्त दूध आणि मिठाईची विक्री होत असल्याचे आढळून आली. या नऊ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली असून रामटेक तालुक्यात २२५० लिटर दूध जप्त करून नष्ट करण्यात आले आहे. तसेच काही नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

 

दरम्यान, तपासणी करताना काहीही गैरप्रकार आढळल्यास कायदा २००६ व नियमन २०११ अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. तसेच भेसळ आढळल्यास जनतेने समितीकडे तक्रार करावी, असे आवाहनही समिती सदस्यांकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here