जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत लष्कराचा जवान शहीद

jawan-shahid
File Photo

श्रीनगर (प्रतिनिधी) : राजौरी जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला. चकमकीत लष्कराचा एक जवानही शहीद झाला आहे. याशिवाय पोलिस एसपीओसह तिघे जखमी झाले आहेत. चकमकीत केंट, २१ आर्मी श्वान युनिटमधील भारतीय लष्कराच्या श्वानाचाही मृत्यू झाला आहे.

जसविंदर सिंग असे शहीद झालेल्या जवानाचे नाव असून तो २१ राष्ट्रीय रायफल्सचा जवान आहे. उपनिरीक्षक मोहम्मद अश्रफ (एसपीओ), कॉन्स्टेबल मोहम्मद रफिक आणि कॉन्स्टेबल मोहम्मद इक्बाल अशी तीन जखमी सुरक्षा कर्मचाऱ्यांची नावे आहेत. ठार झालेला दहशतवादी पाकिस्तानचा असल्याचा संशय आहे.

मंगळवारपासून ही चकमक सुरू आहे. राजौरी जिल्ह्यातील नारला गावात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये ही चकमक सुरू झाली. जवानांनी परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे. जम्मू झोनचे अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश सिंग यांनी गोळीबारात लष्कराचा एका जवानाचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here