पतीने केला गर्भवती पत्नीसह मुलीचा गळा दाबून खून

murder
File Photo

नांदेड (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील माळाकोळी पोलीस स्थानक हद्दीत असलेल्या बोरी (तालुका कंधार) येथील भारतीय सैन्यात जवान असलेल्या पतीने त्याच्या गर्भवती पत्नीसह मुलीचा गळा दाबून खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना त्याच्या बोरी येथील घरी बुधवारी सकाळी ६ वाजता घडल्याचे उघड झाले आहे.

याबाबत समजलेली सविस्तर माहिती अशी की, बोरी (तालुका कंधामाळाकोळीर) येथील सैन्यात जवान असलेला एकनाथ मारुती जायभाय (३२ वर्षे) हा राजस्थान बिकानेर येथे कर्तव्यावरून गावी सुट्टीवर आला असताना त्याने आठ महिन्याची गर्भवती पत्नी भाग्यश्री एकनाथ जायभाय (वय २२), तर मुलगी सरस्वती एकनाथ जायभाये (वय ४) यांचा गळा दाबून खून केला.

हे कृत्य केल्यानंतर आरोपी एकनाथ जायभाय याने स्वतः पत्नीच्या बहिणीला फोनवरून कळविले आणि तो स्वतः माळाकोळी पोलीस स्थानकात हजर झाला. त्याची मृत पत्नी, मुलगी यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी माळाकोळी प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी आणणण्यात आला आहे. सदरील घटनेचे गांभीर्य ओळखून कंधारचे उपविभागीय पोलीस अधिकारी मारुती थोरात यांनी घटनास्थळी भेट दिली. तर माळाकोळीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय नीलपत्रेवार या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here