कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) : जिल्ह्यातील चंदगड सातवणे नजीक झालेल्या अपघातात कोल्हापूर आगाराच्या एसटीखाली चिरडून दत्तू तुकाराम साबळे (वय ५०) यांचा जागीच मृत्यू झाला.
दुचाकी स्वाराला वाचवताना शाळेला जाण्यासाठी बस स्थानकावर थांबलेल्या शुभम गावडे, सिद्धेश ठोकडे (रा. इनाम सावर्डे) तसेच कुणाल कांबळे (रा. कानडी) आणि वैभव कोंडुसकर (रा. पोवाचीवाडी) हे चंदगड तालुक्यातील चार विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत.







