बांगलादेशी मुलीला नोकरी देण्याचं आमिष दाखवून केली कुंटणखान्यात विक्री

crime
file photo

पुणे (प्रतिनिधी सुहास गायकवाड) : बांगलादेशातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला ब्युटी पार्लरमध्ये नोकरी देण्याचं आमिष दाखवून बुधवार पेठेतील कुंटणखान्यात विक्री केल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. या प्रकरणी दोन महिलांसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेशातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला बेकायदेशीररित्या भारतात आणून पुण्यातील बुधवार पेठेतील कुंटखान्यात विक्री करण्याचा प्रकार फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. या गुन्ह्यात दोन महिलांसह तिघांचा सामावेश असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

बांगलादेशातील तरुणी अल्पवयीन आहे. दलाल महिला मारिया उर्फ सोनी आणि एका नेपाळी व्यक्तीने मुलीला पार्लरमध्ये काम देण्याचं आमिष दाखवलं. या मुलीला खोटे सांगून भारतात आणण्यासाठी तयार केलं. त्यानंतर दोघांनी या मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेत तिला बेकायदेशीररित्या भारतात आणले आणि तिची कुंटणखान्यात विक्री केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here