साऊथलेक (अमेरिका) (वृत्तसंस्था) : अमेरिकेत पोलिसांच्या गाडीची धडक बसल्याने एका भारतीय विद्यार्थ्यीनीच्या मृत्यूबाबतचा व्हिडीओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे. भारतीय तरुणीला धडक बसल्यानंतरचा व्हिडीओ पोलिसांच्या अंगावर लावण्यात आलेल्या बॉडी कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाला होता. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
पोलिसांकडून सध्या बॉडी कॅमेऱ्याचे फुटेज तपासले जात आहे. या फुटेजमध्ये विद्यार्थ्यीनीला दिल्यानंतर पोलिस अधिकारी फोन कॉलवर हसताना आणि विनोद करताना दिसत आहे. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर संताप व्यक्त करण्यात येत आहे. भारताकडून या विद्यार्थ्यानीच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
अमेरिकेच्या साउथ लेक युनियनमधील नॉर्थईस्टर्न युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असलेल्या २३ वर्षीय जान्हवी कंदुला या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता. २३ जानेवारी रोजी डेक्सटर अव्हेन्यू नॉर्थ इथल्या थॉमस स्ट्रीटजवळून चालत असताना सिएटल पोलिसांच्या वाहनाने जान्हवीला जोरदार धडक दिली होता. या धडकेत जान्हवीचा मृत्यू झाला होता. जान्हवीच्या मृत्यूनंतर अमेरिकेतील भारतीय दूतावासाने सिएटल आणि वॉशिंग्टन येथील स्थानिक अधिकारी तसेच बायडेन प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी केली होती.







