निंबोळा येथील उपबजार आवारात दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर खरेदी विक्रीचा शुभारंभ

devala-krushi-bazar-samitti
देवळा बाजार समितीच्या निंबोळा येथील नियोजित उपबजार आवारातील शेतमाल खरेदी विक्री केंद्राच्या भूमिपूजन प्रसंगी उपस्थित सभापती योगेश आहेर,माजी सभापती केदा आहेर ,सरपंच प्रदीप निकम ,संचालक दिलीप पाटील ,भाऊसाहेब पगार आदी (छाया - सोमनाथ जगताप )

नाशिक (उपसंपादक कुबेर जाधव) : देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने निंबोळा येथे उपबजार आवार सुरू करण्यात येणार असून, या उपबबाजार आवारातील खरेदी विक्री केंद्राच्या जागेचे गुरुवारी दि १४ रोजी भूमिपूजन करण्यात आले .या उपबजार आवारात दसऱ्याच्या शुभमहूर्तावर शेतमाल खरेदी विक्रीचा शुभारंभ करण्यात येणार आल्याची माहिती यावेळी सभापती योगेश आहेर ,माजी सभापती केदा नाना आहेर यांनी दिली .

देवळा बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर नूतन पदाधिकारी व संचालक मंडळाने शेतकरी हिताचे निर्णय हाती घेतले आहेत .बाजार समितीच्या देवळा येथील मुख्य यार्डात शेतकरी निवारा गृह , स्वच्छ पिण्याचे पाणी ,सुलभ शौचालय ,वाहनांना टोकन पद्धत ,रोख पेमेंट ,सीसीटीव्ही कॅमेरे ,उपहारगृह आदी सुख सुखसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत . यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

बाजार समितीच्या वतीने पूर्वभागातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार तालुक्यात निबोळा येथे उपबजार आवार सुरू करण्यात येणार आहे, त्याचे गुरुवारी दि १४ रोजी भूमिपूजन करण्यात आले .याठिकाणी शेतकऱ्यांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून,दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर शेतमाल खरेदी विक्रीचा शुभारंभ करण्यात येणार आहे. यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांची वेळीची व पैशांची बचत होणार असून ,आपला शेतमाल इतरत्र नेण्याची गरज पडणार नाही .नियोजन उपबाजार आवार लवकरच सुरू होणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

यावेळी सभापती योगेश आहेर ,माजी सभापती केदा आहेर , माजी संचालक पंडितराव निकम , लोकनियुक्त सरपंच प्रदीप निकम , वासोळचे सरपंच स्वप्नील पाटील ,नगरसेवक जितेंद्र आहेर ,संचालक शिवाजी आहिरे , दिलीप पाटील , अभिजित निकम, भाऊसाहेब पगार,अभिमन पवार , शिवाजीराव पवार , विजय सोनवणे ,निंबा धामणे संजय शिंदे ,योगेश गुंजाळ भाऊराव नवले ,सचिव माणिक निकम आदींसह निबोळा व परिसरातील शेतकरी अरुण पवार ,भिका पवार, अरुण सावंत, कैलास निकम, जवाहर निकम ,वसंत निकम दत्तू निकम, गबाजी निकम, राजेंद्र अहिरे ,अनिल आहेर ,बंडू परदेशी,छबु भामरे ,सर्व कर्मचारी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रास्ताविक करून कैलास निकम यांनी आभार मानले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here