किशोर सूर्यवंशी पतसंस्थेच्या वतीने रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सभासदांना आकर्षक भेट वस्तू

devala
देवळा येथील किशोर सूर्यवंशी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला संबोधित करतांना संस्थापक चेअरमन प्रमोद पाटील समोर उपसस्थित सभासद आदी ( छाया -सोमनाथ जगताप )

नाशिक (उपसंपादक कुबेर जाधव) : देवळा येथील किशोर सूर्यवंशी नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी दि १५ रोजी संस्थापक चेअरमन प्रमोद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली . एकूण १३५३ सभासद संख्या असलेल्या या .संस्थेची स्थापना होऊन २३ वर्ष पूर्ण होत असून ,संस्था रौप्य महोत्सव वर्षाकडे वाटचाल करीत आहे .

याप्रसंगी सभासदांना ६ टक्के लाभांश देण्याचे जाहीर करण्यात आले असून ,रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने सभासदांना आकर्षक भेट वस्तू देण्यात येणार आहे . यावेळी व्हा चेअरमन कौतिक पवार ,संचालक शांताराम आहेर , प्रदीप आहेर , शरद आहेर ,प्रदीप तुकाराम आहेर , डॉ सुदर्शन पाटील , डॉ संजय निकम , भगवान पवार , रोहित चंदन , विजय मेतकर , संगीता देवरे , गीताताई पाटील , अर्चना वाघमारे आदींसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते .

अहवाल वाचन व्यवस्थापक प्रशांत नाखरे यांनी केले .आभार प्रदीप आहेर यांनी मानले . सभा यश्वीतेसाठी सचिव भालचंद्र उगले , जितेंद्र सोनवणे , सोमनाथ शिंदे , हंसराज देवरे आदी कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here