
नाशिक (उपसंपादक कुबेर जाधव) : देवळा येथील शरदराव पवार नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी १७ रोजी चेअरमन योगेश आहेर यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली .
संस्थेचे अहवाल वर्षात कर्जवसुलीचे प्रमाण नगण्य असून,थकबाकीदार सभासदांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली असून, संस्थेला लेखापरीक्षणाचा “अ ” वर्ग प्राप्त झाला आहे. यावर्षी सभासदांना आकर्षक भेट वस्तू वाटप करण्याचा यावेळी निर्णय घेण्यात आला. सभासदांनी वेळेत कर्जाची परतफेड करून सहकार्य करावे असे आवाहन चेअरमन योगेश आहेर यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना केले .
यावेळी नगराध्यक्षा सुलभा आहेर,मविप्र संचालक विजय पगार ,बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब पगार ,वसुली अधिकारी सतीश पुणेकर, प्रा डी के आहेर,प्रा सतिष ठाकरे,अमोल आहेर,संजय शिंदे,विजय सोनवणे, संजय गायकवाड, काशिनाथ पवार,चिंतामण आहेर,विनोद देवरे आदींचा तसेच सभासद पाल्यांचा गुणगौरव करण्यात आला . याप्रसंगी व्हा चेअरमन हिरामण आहेर,संचालक तुळशीराम आहेर,बाळासाहेब मगर,अतुल आहेर,नानाजी आहेर ,नितीन नवले, लीना आहेर,वनिता शिंदे, पुंडलिक आहेर, शँकर बच्छाव,नानाजी आढाव आदीसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते . अहवाल वाचन व्यवस्थापक प्रमोद देवरे यांनी केले .आभार अतुल आहेर यांनी मानले . सूत्रसंचालन मोठाभाऊ पगार यांनी केले . सभा यश्वीतेसाठी बापू आहेर,रमेश जाधव ,भिला सोनवणे, योगेश आहेर, तुषार मोरे,संदीप आहेर ,अल्पबचत प्रतिनिधी आदी कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले .






