विठेवाडी ता देवळा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची सर्वसाधारण सभा शांततेत संपन्न

विठेवाडी

नाशिक (उपसंपादक कुबेर जाधव) : देवळा तालुक्यातील अत्यंत नावारूपाला आलेल्या विठेवाडी, झिरेपिंपळ येथिल विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची सर्वसाधारण सभा दि २२ सप्टेंबर रोजी अंत्यंत शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक विषयांवर साधकबाधक चर्चा करण्यात आली.

 

थकबाकीदार खातेदारांच्या थकित कर्जाचे हफ्ते चुकवण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ओटीएस योजनेची सविस्तर माहिती सभासदांना करून देण्यात आली, संस्थेच्या अहवाल काळातील इतिवृत्ताचे वाचण संस्थेचे सचिव श्री संजय निकम यांनी केले, कामकाजाची सुरुवात अहवाल काळातील दिवंगत झालेल्या मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली.

 

यावेळी संस्थेच्या प्रगतीचा आढावा व प्रास्ताविक संस्थेचे जेष्ठ संचालक पी डी निकम यांनी केले तर सुत्र संचालन संचालक श्री कुबेर जाधव यांनी पार पाडले, यावेळी सर्वसाधारण सभेपुढे असलेल्या विषय पत्रिकेतील विषयावर अत्यंत शांततेत चर्चा करण्यात आली, या वर्षी देवळा तालुक्यातील बहुतांश भागात प्रचंड दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असल्याने शासनाने देवळा तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून जाहीर करण्यात यावा तसेच केंद्र सरकारने कांदा निर्यातीसाठी लादलेले ४०% निर्यात शुल्क मागे घ्यावे,अशा आशयाचा ठराव मा जिल्हा अधिकारी यांना पाठवण्यात यावा असा ठराव सर्वसाधारण सभेत करण्यात आला.

 

यावेळी संस्थेचे जेष्ठ सभासद दिनकर जाधव, पंडित निकम,फुला जाधव, वसंत निकम,जिभाउ निकम, भास्कर निकम, राहुल निकम, विठोबा सोनवणे,इस्वर निकम, राजेंद्र निकम, माणिक निकम, रावसाहेब निकम, भालचंद्र निकम, संजय निकम, दिलिप निकम, मिलिंद निकम, दादाजी सोनवणे, शंकर निकम, पुंजाराम पवार, काशिनाथ बोरसे, नंदकिशोर निकम, प्रविण निकम, सतिश निकम, संजय सावळे, मधुकर निकम , संदिप निकम,परशराम आहेर, सुभाष पवार, आदी सह बहूसंख्य सभासद उपस्थित होते , विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब सोनवणे, उपाध्यक्षा सौ सुनंदा निकम, प्रशांत निकम, समाधान निकम,पि डी निकम, कुबेर जाधव, महेंद्र आहेर, अभिजित निकम, तानाजी निकम, शशिकांत निकम, कैलास कोकरे,जिभाउ बोरसे, भिकाजी शेळके,तकदिर कापडनिस,सचीव संजय निकम,सह सचिव सुभाष पवार आदी संस्थेचे संचालक, सभासद व कर्मचारी उपस्थित होते, शेवटी संचालक श्री शशिकांत निकम यांनी आभार मानले,,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here