ओरिऑनच्या विद्यार्थ्यानीचा शालेय मनपा फूटबॉल स्पर्धेत पहिला क्रमांक

orion-school-football-team

जळगाव (संपादक सुनिल पाटील) : के. सी. ई. सोसायटी संचलित ओरिऑन इंग्लिश मिडीयम स्कूलच्या १७ वर्षे वयोगटातील मुलींचा शालेय मनपा फूटबॉल स्पर्धेत विजय झाला आहे. दि. २३ सप्टेंबर २०२३ ला शालेय मनपा फूटबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ओरिऑन स्कुलने पहिला क्रमांक पटकावला आहे.

या स्पर्धेसाठी गेलेल्या संघात आर्शिया तडवी, अनुष्का पवार, अनुश्री निंभोरे, श्रद्धा पाटील, गायत्री चौधरी, राजेश्वरी पाटील, हर्षिता पाटील, समृद्धी पाटील, दिव्या मोरे, सृष्टी शिंपी, खुशी वाणी, स्वप्नाली वानखेडे, तीतिक्षा जोशी, निकिता खैरनार, मयुरी चौधरी ह्या विद्यार्थीनीचा समावेश होता.विजयी संघाला आकाश सराफ यांनी विद्यार्थिंनींना प्रशिक्षण दिले होते.

मनपा फुटबॉल स्पर्धेत या विद्यार्थीनी विजयी झाल्याने आता त्या पुढील विभागीय स्पर्धेसाठी जात आहेत. या विद्यार्थिंनींचे संस्थेचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार जी. बेंडाळे, शाळेचे प्राचार्य श्रीधर सुंकरी व उपमुख्याध्यापिका सौ. चंद्रकला सिंग तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यानी त्यांचे अभिनंदन केले असून, विभागीयस्तरावरील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here