एजीसी इव्हेंट चा पुरस्कार वितरण संपन्न
नाशिक (जिल्हा संपादक प्रमोद जाधव) : ग्रामीण भागात शेती करताना अनेक अडचणी येतात, बऱ्याच वेळा शेती परवडत नाही परंतु शेतीला जोडधंदा देत आणि युवा वर्ग, शेतकरी ग्रामीण भागेत विविध व्यवसाय सुरू करत आहेत, शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना करून अनेक व्यवसायांना संधी आहे, सेंद्रिय शेती करणे देखील काळाची गरज आहे, विविध कृषी उद्योजकतेतून पुढील शेतीचा विकास शक्य होईल असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी केले. कृषीभूषण महाराष्ट्र एफपिओ फेडरेशन आयोजित कृषी उद्योजकता प्रशिक्षण व एजीसी इव्हेंट प्रस्तुत इन्स्पायर पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.
महाराष्ट्रातील कृषी उद्योजक व आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन एजीसी इव्हेंट या कंपनीच्या माध्यमातून करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रिझर्व बँक ऑफ इंडियाचे मुख्य लेखापाल सीए चतुर्वेदी, सिने अभिनेत्री स्मिता प्रभू, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रमुख संशोधक डॉ. तुळशीदास बास्टेवाड, ऍग्रोकेअर ग्रुप ऑफ कंपनीचे चेअरमन भूषण निकम, आबा अहिरे, आयोजक रोहिणी पाटील, प्रकाश सांगळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी कृषीभूषण फेडरेशन आयोजित ॲग्री स्टार्टअप कन्वेंशन या कृषी उद्योजकता प्रशिक्षणामध्ये महाराष्ट्रातून शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक, शेतकरी, कृषी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना, व्यवस्थापन, शासकीय योजना, भविष्यातील वाटचाली, उद्योगातील विविध संधी या विषयावर कृषीभूषण फेडरेशनचे चेअरमन भूषण निकम यांनी मार्गदर्शन केले, तर शेतमाल निर्जलीकरण या विषयावर दीपक पाटील यांनी मार्गदर्शन केले, कंपनी व्यवस्थापन व कायदेशीर बाबी या विषयावर सी एस मंगेश मंगरूळकर, कृषी अवजार बँक या विषयावर डॉ. बास्टेवाड यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजक रोहिणी पाटील यांनी प्रास्ताविक केले तर दीपक पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. सूत्रसंचालन अँकर आदित्य यांनी केले.
पुरस्कारार्थी खालील प्रमाणे
इन्स्पायर अवार्ड – निवृत्ती कुशारे नाशिक, परशराम हरकळ बुलढाणा, रमेश परिहार नाशिक, कल्पना मुखेडकर मुंबई, बाबुराव कळसाईत सोलापूर, शशांक देशमुख अमरावती, संजय बगे बुलढाणा, रामचंद्र राठोड यवतमाळ, संजय मुखेडकर मुंबई, सदाशिव जावणे अहमदनगर, बाजीराव पाचपुते येवला, बुधा पाटील जळगाव, धैर्यशील बावस्कर पुणे, कर्मण्य मुखेडकर मुंबई, सुरेश पवार सांगोला, सुनील पाटील जळगाव, स्मिता प्रभू नाशिक, तुळशीदास बासटेवाड राहुरी, अशोक जाधव पाचोरा यांचा पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला.
इनोव्हेटिव्ह टीचर अवार्ड
शशी सक्सेना सातपूर, चिंधू रोटे निफाड, सचिन अहिरे सटाणा, लक्ष्मण दुर्धवळे,सटाणा, मीनाक्षी सोनवणे सटाणा, खंडेराव पाटील दोंडाईचा, ज्योती भामरे सातपूर, शेख नजमा नाशिक, प्रदीप महाले नाशिक, शेख अशपाक यावल, टूफेल अहमद भुसावळ, आबा अहिरे सटाणा यांना इनोव्हेटिव्ह टीचर ॲवार्ड देण्यात आले.







