प्रेयसीच्या खून केल्यानंतर मृतदेहावर बलात्कार करणारे तिघे अटकेत

rape
file photo

करीमगंज (आसाम) (वृत्तसंस्था) : येथे अल्पवयीन प्रेयसीची हत्या करून प्रियकर व त्याच्या दोन मित्रांनी तिच्या मृतदेहावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

हत्याकांडाचा सूत्रधार रेल्वेचा नवनियुक्त चतुर्थश्रेणी कर्मचारी आहे. त्याचे या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. तो शारीरिक संबंधासाठी दबाव टाकत होता. मुलगी नकार देत होती. ९ सप्टेंबर रोजी मुलगी घरी एकटी असल्याचे समजल्यानंतर आरोपी दोन मित्रांसह घरी गेला. तिघांनी बळजबरीने तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. मुलीने विरोध केल्यानंतर त्यांनी तिचा गळा दाबून खून केला व नंतर मृतदेहावर बलात्कार केला. त्याच दिवशी करीमगंज बायपासजवळ तिचा मृतदेह सापडला.

मुलीच्या वहीत नोंदविलेल्या मोबाइल क्रमांकावरून पोलिसांना आरोपींचा सुगावा लागला. बिप्लब पॉल, शुभ्रा मालाकर व राहुल दास अशी आरोपींचे नावे आहेत. दास हा सूत्रधार आहे. त्याने चौकशीत मुलीसोबतचे प्रेमसंबंध उघड केले. आपण तिच्याशी संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला; मात्र, तिने नकार दिला. त्यामुळे हे कृत्य केले, अशी कबुली दिली. शुभ्रा मालाकरकडून दोन सिमकार्ड घेतले होते. त्यातील एक तो व पीडित मुलगी वापरत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here