बुलंद पोलीस टाइम्सचे संपादक सुनिल पाटील राष्ट्रीय इनस्पायर ॲवार्डने सन्मानीत

sunil-patil

नाशिक (जिल्हा संपादक प्रमोद जाधव) : येथे बुधवारी २७ सप्टेंबरला आयोजित कृषीभूषण महाराष्ट्र एफ.पी.ओ. फेडरेशन आयोजित कृषी उद्योजकता महापरिषद नाशिक व एजीसी इव्हेंट प्रस्तुत नॅशनल इन्स्पायर ॲवार्ड २०२३ या सन्मान सोहळ्यात पत्रकारिता व कृषी क्षेत्रात विशेष कार्य केल्याबद्दल बुलंद पोलीस टाइम्सचे संपादक सुनिल पाटील यांना नॅशनल इन्स्पायर ॲवार्डने सन्मानीत करण्यात आले.

suni-patil-awardedहा पुरस्कार त्यांना यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिकचे कुलगुरु प्रा.संजीव सोनवणे व अभिनेत्री स्मिता प्रभू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख
पाहुणे म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्य लेखापाल सीए चतुर्वेदी, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रमुख संशोधक डॉ.तुळशीदास बास्टेवाड, ग्रोकेअर ग्रुप ऑफ कंपनीचे चेअरमन भूषण निकम, आबा अहिरे, आयोजक रोहिणी पाटील, प्रकाश सांगळे आदी उपस्थित होते.

कृषी कार्यासोबतच पत्रकारितेच्या माध्यमातून सुनिल पाटील सामाजिक कार्यातही सहभागी असतात. सामाजिक बांधीलकी जपत अनेक सामाजिक कार्यात मोलाचे कार्य केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे.

 

editor-sunil-patil

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here