पोलिसात तक्रार दिली म्हणून पतीकडून पत्नीला पोलीस ठाण्यासमोर मारहाण

ladies-marhan
File photo

पुणे (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्टर लक्ष्मीनारायण वनम) : पती विरोधात पोलिसांकडे तक्रार दिली म्हणून पत्नीला पोलीस ठाण्या समोरच मारहाण करण्यात आली आहे. ही घटना सोमवारी (दि,२९) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यासमोर घडली.

याप्रकरणी पत्नीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.३०) फिर्याद दिली. यावरून उमेश हिरामण हेंद्र (वय ३१ रा. देहुगाव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांच्या आई, आजी या आरोपी विरोधात पोलीसांकडे तक्रार देऊन परतत असताना आरोपीने फिर्यादीला आडवले. माझ्या विरोधात तक्रार दिली म्हणून शिवीगाळ केलू तसेच लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्यांनी मारहाण केली. यावरून एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here