रेल्वे प्रवाशाचे पाकीट मारणाऱ्या आरोपीस रंगेहाथ अटक

खिसेकापू

मुंबई (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्टर लक्ष्मीनारायण वनम) : दि . 29/01/2024 रोजी ग्रुप A मध्य परिमंडळ गुन्हे शाखा लोहमार्ग मुंबई , अंतर्गत महिला सुरक्षा पथक WASI / इंगवले , WHC / 2959 तरे , WPN / 2918 माने , WPC / 438 कोरडे तसेच CSMT रेल्वे पोलीस ठाणे WPC / 3533 पाटील यांना दुपारी 14.00 ते 21.00 वा . पर्यंत गुन्हेगारांवर आळा घालणेकामी तसेच महिलांचे / मुला मुलींचे सुरक्षेसाठी नेमले असतांना ठाणे रेल्वे स्टेशन येथे 15/00 वा . पासून गस्त करीत असताना एक इसम दखलपात्र गुन्हा करण्याच्या इराद्याने वावरत असताना दिसून आला म्हणून त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवत असताना त्याने फलाट क्र 2 वर 17.44 वा . आलेल्या कल्याण स्लो लोकल गाडीचे गार्डपासून दुसरे पुरूषांचे जनरल डब्यात चढणा – या रेल्वे प्रवासी यांच्या गर्दीत घुसून एका रेल्वे प्रवासी यांच्या नेसते पँटच्या खिशातील पाकीट काढून पळून जात असताना वरील संपूर्ण महीला सुरक्षा पथकाने त्यास रंगेहाथ पकडले .

आरोपीस पकडून घेऊन जात असताना एका रेल्वे प्रवासी यांनी सांगितले की त्यांचे खिशातील पाकीट पकडलेल्या इसमाने चोरी केले आहे . म्हणून रेल्वे प्रवासी व पकडलेल्या आरोपीस ठाणे रेल्वे पोलीस ठाणे येथे आणून गुन्हे प्रकटीकरण शाखेत आणून वरिष्ठांसमक्ष हजर केले तेथे DB स्टाफ यांनी दोन पंचासमक्ष आरोपीचे नाव पत्ता विचारले असता आरोपी नामे अमोल राजू खंदारे , त्याचे अंगझडतीत फिर्यादी नामे इंद्रजित दत्तात्रय बोंबले यांचे चोरलेले ब्राऊन रंगाचे पाकीट मिळून आले , त्यात 570 रूपये रोख , फिर्यादी यांचे नावाचे आधारकार्ड , पॅनकार्ड , ड्रायव्हिंग लायसन्स , बँक ऑफ बडोदा चे ATM कार्ड , रेल्वे पास व इतर किरकोळ कागदपत्रे मिळून आली ती फिर्यादी यांनी ओळखून त्यांनी आरोपी विरूद्ध तक्रार दिल्याने ठाणे रेल्वे पोलीस ठाणे गु.र.नं. 144 / 2024 कलम 379 भा.द.वि प्रमाणे नोंद करण्यात आला आहे . तसेच आरोपीचा पुर्व इतिहास पडताळून पाहीला असता त्याचेवर शिवाजी नगर पोलीस ठाणे नांदेड येथे गु.र.नं. 270 / 2021 कलम Limitation act 5 प्रमाणे तसेच नांदेड जिल्हात अजून इतर गुन्हे दाखल आहेत . कल्याण रेल्वे पोलीस ठाणे ( मुद्देमाल परत केल्याबबत ) दि .२ ९ / १ / २०२४ रोजी कल्याण रेल्वे स्टेशन येथे कर्तव्यावर हजर असताना . २१/३६ वा . नियंत्रण कक्ष वाडी बंदर लोहमार्ग मुंबई येथून पो . हा . शिवचरण यांनी कल्याण रेल्वे स्टेशन येथे २१ / २८ वा येणारी डाऊन कल्याण एसी लोकल च्या मोटर मॅन बाजूकडील चौथ्या डब्बा चेक करा कळ्या रंगाची बॅग प्रवासी विसरले असून सदर गाडी अटैंड करा असे कळवले असता .

 

mumbai-police

सदर गाडी फलाट क्रमांक -१ वर २१/४६ वा . अटेंड केली असता बॅग मिळून आली आहे . तसे नियंत्रण कक्ष वाडी बंदर येथे पो.शि. पोळ यांना कळविले असुन प्रवासी नामे रफिक हुसेन गलियारा वय- 53 वर्ष धंदा- यांना कल्याण रेल्वे स्टेशन येथे बोलावून घेऊन सदर बॅग प्रवासी यांची खात्रीपूर्वक विचारपूस करून आतील सामानासह प्रवासी यांच्या सुपूर्त केली आहे . अंधेरी रेल्वे पोलीस ठाणे ( ३०००० किमतीचा लॅपटॉप परत केल्याबाबत ) पो.शी / १११० सोनावणे दि . ३०/०१/२०२३ रोजी दिवसपाळी ड्युटी सोबत पो.हवा / ८२२ ठाकूर , म.पो. हवा / २ ९ ४२ , पो . शी / ११७३ असताना सुमारे ११:२६ व . R track यांनी कळविले की विरार जलद AC लोकल मध्ये विरार बाजू च्या जेष्ठनागरिक डब्यात एक काळ्या रंगाची बॅग असून त्यात HP कंपनी चे लॅपटॉप अंदाजे किंमत ३०,००० / – असे प्रवाशी विसरले आहे . कळवले वरून तात्काळ जाऊन लोकल अटेंड केली . सदर बॅग प्रवाशी नामे भरत मंगे राह . वसई यांची असून खात्री करून त्यांच्या ताब्यात दिली .

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here