चाळीसगाव (प्रतिनिधी तन्वीर शेख) : दिनांक (दि.७) माता रमाई जयंतीनिमित्त खडकी बु, तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव, येथे माता रमाई जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी चाळीसगाव तालुकाध्यक्ष विलास आधार चव्हाण यांच्याकडून शाळकरी मुला मुलींना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी व मार्गदर्शक जिल्हाध्यक्ष जळगाव पश्चिम प्रमोद इंगळे उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष चाळीसगाव यांच्या हस्ते मुलांना साहित्य वाटप करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते मुकेशभाऊ नेतकर यांनी माता रमाई यांचे कार्य व त्यांचा त्याग आपल्या भाषणातून त्यांनी माता रमाई व त्यांचा त्याग महिलांना व पुरुषांना समजून सांगितले.
कार्यक्रमाला शहराध्यक्ष सागर निकम, खडकीचे सरपंच सचिन पवार, उपसरपंच धनंजय मांडोळे,

ग्रामपंचायत सदस्य, दीपक जाधव, सामाजिक कार्यकर्ते मुकेश भाऊ नेतकर, विलास जाधव,राजेंद्र जाधव, निलेश जाधव, खडकीचे मुख्याध्यापक, उत्तम सोनवणे, श्री.राठोड आदी उपस्थित होते.







