नागपूरमध्ये महिला कामगारांच्या वाहनाला भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू

नागपूर अपघात

नागपूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर आकाश शेगये) : येथील भिवापूर तालुक्यातील बेला पोलीस स्टेशनच्या हद्दीत महिला कामगारांच्या वाहनाचा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. कामगार महिला कामानिमित्त बेला पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे.

ब्रम्हपुरीतील कामगार नेहमीप्रमाणे गाडी क्रमांक (एम एच. ३३ ए१९४७) टाटा सुमोने वायगाव (जि.वर्धा) येथे दररोज मजुरीला येत होते. दिनांक (दि.८) गुरुवारी सायंकाळच्या सुमारास कामावरून परत जात असताना ड्रायव्हरचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि अपघात होऊन तीन मजूर जागीच मृत्यू पावले तर बारा मजूर जखमी झाले. अपघात एवढा भीषण होता की रुग्णांना गाडीतून ओढून काढण्यात आले.

घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून ते याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. सदर अपघाताचा तपास बेला पोलिस स्टेशनचे ए.पी.आय. मेश्राम करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here