कृषी क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्याबद्दल कुबेर जाधव यांना राज्यस्तरीय कृषीभूषण पुरस्कार जाहीर

कुबेर जाधव

जळगाव (संपादक सुनिल पाटील) : कृषी क्षेत्रांतील पत्रकारिता,आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय कृषीभूषण पुरस्कार इंजी. कुबेर जाधव यांना जाहीर करण्यात आला आहे.

कृषीभूषण महाराष्ट्र स्टार्ट अप फेडरेशन आयोजित ५ व्या वर्धापन दिनानिमित्त कृषीभूषण एक्सलन्स अवार्ड आयोजित करण्यात येतो. कृषी क्षेत्रांतील उद्योगता, अॅग्रोप्रोड्यूसर कंपनी कृषी विद्यापीठात उल्लेखनीय कामगिरी, कृषी विभागाअंतर्गत शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेल्या कामाबद्दल, तसेच कृषी पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राज्यस्तरावरील व्यक्तीचा शोध घेऊन त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येते.

विठेवाडी येथील भुमीपुत्र ३५ वर्ष वसंत दादा सहकारी साखर कारखान्यांच्या सेवेत सिव्हिल इंजिनिअर म्हणून‌‌‌ कार्यरत असतांना कृषी आणि सहकार क्षेत्रातील विविध घडामोडींवर मुक्त पत्रकार म्हणुन गेले २५ वर्ष सातत्याने लिखाण करीत आहेत.विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यातील सर्व दैनिकांत संपादकीय पानावर कृषी, सहकार, चळवळ, सामाजिक क्षेत्रातील विषयावर विस्तृत लिखाण केले आहे. त्याची दखल घेऊन कुबेर जाधव यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना कृषीभूषण एक्सलन्स अॅवार्ड जाहीर करण्यात आले आहेत. कुबेर जाधव यांना कृषीभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here