कोल्हापूर (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्टर सतिश चव्हाण) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार इचलकरंजी शहर जिल्हा कार्यालय आणि श्री टेके आय केअर हॉस्पिटल सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डोळे तपासणी व शस्त्रक्रिया मोफत उपचार ,मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे उदघाटन पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पी एम पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रांतिक सदस्य मदनरावजी कारंडे, जिल्हाध्यक्ष विधानसभा इचलकरंजी नितीनदादा जांभळे, युवा नेते प्रमोददादा पाटील, कबनूरच्या सरपंच सौ.शोभा पोवार, उपसरपंच सुधीर लिगाडे, कबनूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य सैफ मुजावर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी ग्रामस्थांनी या शिबीराचा सर्वांनी लाभ घ्यावा असे ग्रामस्थांना आवाहन केले. ग्रामपंचायत सदस्य
सैफ मुजावर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी भैया जाधव, समीर जमादार, श्रीमती रजनी गुरव, सौ.रोहिणी स्वामी, सौ.अर्चना पाटील, डॉ. अस्मिता मिश्रा, सुनील इंगवले, बाबासो कोकणे, बी.जी. देशमुख, गणीभाई मुल्ला, नागेश शेजाळे, जावेद मुजावर, भैय्या मुजावर, सतिश चव्हाण, दस्तगीर मुजावर, नईम मुल्ला, मोहसीन पिरखान, सचिन उतुरे, विनोद उतुरे, राम कांबळे, मुकेश घाटगे उपस्थित होते.







