महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ फैजपूर शहराध्यक्ष राजू तडवी यांचा गौरव

फैजपूर (विशेष प्रतिनिधी) – लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकार क्षेत्र ओळखले जाते. समाजावर जेव्हा जेव्हा संकट येते तेव्हा आपल्या लेखणीच्या सहाय्याने वा कार्यातून त्यावर मात करणे वा आवाज उठवणे हे पत्रकाराचे कर्तव्य असते. गेल्या पाच महिन्यांपासून सुरु असलेल्या कोरोना विषाणूच्या संक्रमण आपत्तीत सामाजिक बांधीलकी जपत निर्भीडपणे आपली व आपल्या कुटुंबाची पर्वा न करता तनमनधनाने नागरिकांना मदत केल्याबद्दल तसेच पत्रकारिता क्षेत्रातील आजवरच्या निःस्वार्थ सेवेबद्दल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ फैजपूरचे शहराध्यक्ष राजू तडवी यांचा गौरव करण्यात आला. फैजपूरचे प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले व उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांच्या हस्ते त्यांना सन्मानपत्र देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here