पुणे (अजय पवार) – जेष्ठ पत्रकार कवी व रायगड भूषण माननीय जयपाल परशुराम पाटील यांना बहुजन एकता महासंघ आणि साजिर प्रतिष्ठानच्या वतीने कोविड योद्धा सन्मान पत्र देऊन शनिवार दिनांक 15 ऑगस्ट रोजी पुणे येथे गौरविण्यात येणार होते, परंतु काही कारणास्तव त्यांना येता आले नाही,जयपाल पाटील यांचे कोविड योद्धा सन्मानपत्र काचपत्रा वेचून आलेल्या पैशातून गोरगरिबांची भूक भागविणाऱ्या सौ.सुनीता गायकवाड या वृद्ध महिलेने वडगाव शेरी पुणे येथे स्वीकारले.







