अंधश्रद्धा निर्मूलन प्रकल्पांतर्गत रायसोनी महाविद्यालय जनजागृती

raisoni-college

जळगाव (क्राइम रिपोर्टर गिरीश पवार) : रायसोनी महाविद्यालयीन व्यवस्थापन विभागांतर्गत महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी समाजातील अंधश्रद्धा निर्मूलन करणे, हा प्रकल्प घेऊन जनजागृती करीत आहेत.त्यात अक्षयकुमार धुगे,लखीचंद मुंगड, गोविंदा कहाने, आकाश नेवासकर आणि अमन परदेशी या विद्यार्थ्यांनी सदर प्रकल्प विभागामार्फत राबवित आहेत.

 

त्या उपक्रमाअंतर्गत माध्यमिक विद्यालय धारशेरी ता.धरणगाव जिल्हा -जळगाव या विद्यालयात चमत्कारातून विज्ञान या विषयावर दिगंबर कट्यारे राज्य कार्यवाह वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्प विभाग यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.त्यात त्यांनी पाण्याने भरलेला दिवा पेटविणे, जिभेतून सुई आरपार काढणे, हातातून रक्त काढणे, दोरीच्या गाठी गायब करणे,कलशातून अखंडपणे पाणी काढणे,मंत्राने यज्ञ पेटविणे असे विविध चमत्कार सादरीकरण करुन वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे कार्यकारणभाव तपासणे ही संकल्पना स्पष्ट केली.

 

आपल्या समस्या आपणच सोडवू शकतो, बाबा बुवा यांच्या कडे जाऊन आपले शोषण होते असेही कट्यारे सरांनी ठासून सांगितले. सदर कार्यक्रमाचे प्रस्तावना आणि सूत्रसंचालन मुख्याध्यापक मयुर पाटील यांनी केले.कार्यक्रम प्रसंगी विद्यालयातील शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी चमत्कार प्रात्यक्षिके सादर केली, हे वैशिष्ट्य होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here