श्रीनगर (वृत्तसंस्था) : नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी १६ ऑक्टोबरला जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ते या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. श्रीनगर येथील शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटर येथे हा कार्यक्रम झाला. शपथविधी सोहळ्यासाठी राहुल गांधी, प्रियांका गांधी, सपा प्रमुख अखिलेश यादव, आप नेते संजय सिंह यांच्यासह ६ पक्षांचे नेते उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओमर अब्दुल्ला यांचं अभिनंदन केलय. त्यांनी म्हटलं की, “जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेल्याबद्दल ओमर अब्दुल्ला यांचं अभिनंदन. लोकांची सेवा करण्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा.”
Congratulations to Shri Omar Abdullah Ji on taking oath as the Chief Minister of Jammu and Kashmir. Wishing him the very best in his efforts to serve the people. The Centre will work closely with him and his team for J&K's progress. @OmarAbdullah
— Narendra Modi (@narendramodi) October 16, 2024
जम्मू-काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री कविंदर गुप्ता म्हणाले, “जम्मू-काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशातील पहिल्या सरकारचं मला अभिनंदन करायचं आहे. मला आशा आहे की ते जम्मू-काश्मीरचा विकास करतील.
पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या, “जम्मू-काश्मीरला अनेक वर्षांनी स्वतःचं सरकार मिळालय. २०१९ नंतर जम्मू-काश्मीरच्या लोकांना खूप त्रास सहन करावा लागला. आता स्थापन झालेलं सरकार सर्व जखमा भरून काढणार. ओमर अब्दुल्ला यांनी १९९८, १९९९ आणि २००४ मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये श्रीनगर मतदारसंघातून निवडून येऊन आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी २००२ मध्ये नॅशनल कॉन्फरन्सचं प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारला. २००९ मध्ये ओमर अब्दुल्ला जम्मू-काश्मीरचे सर्वात कमी वयाचे मुख्यमंत्री बनले. २०१५ पर्यंत ते मुख्यमंत्री या पदावर होते. ओमर अब्दुल्ला यांचे वडील फारुख अब्दुल्ला तसंच आजोबा शेख अब्दुल्ला हे दोघंही जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री राहिले आहेत.







