ॲड. सुशील अत्रे यांच्या घरावर दगडफेक; जिल्हा पेठ पोलिसांनी घेतले १० ते १२ जणांना ताब्यात

dagadfek

जळगाव (प्रतिनिधी निलेश पाटील) : शहरातील प्रताप नगर येथील एका धार्मिक स्थळाचे अतिक्रमण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काढण्याच्या कारणावरून शुक्रवारी १८ ऑक्टोबर रात्री ११ वाजता प्रतिथयश विधीज्ञ ॲड. सुशील अत्रे यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी १० ते १२ जणांना ताब्यात घेतले आहे.

 

याबाबत समजलेली माहिती अशी की, शहरातील प्रताप नगर परिसरात असलेल्या एका धार्मिक स्थळाचे अतिक्रमण असण्याच्या कारणावरून गेल्या अनेक वर्षांपासून तक्रार होती. नुकतेच हे अतिक्रमण काढण्याचे आदेश देण्यात आल्याने ते काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यावरून काहीजण संतप्त झाले. त्यामुळे शुक्रवारी १८ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास मोठा जमाव प्रताप नगर परिसरातील धार्मिक स्थळाच्या ठिकाणी जमला व अतिक्रमण काढण्यास विरोध दर्शविण्यात आला.

 

त्यानंतर जमावाने धार्मिक स्थळापासून जवळच असलेल्या ॲड. सुशील अत्रे यांच्या घरावर दगडफेक केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पेठ पोलीस घटनास्थळी पोहोचले. तेथून १० ते १२ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत याबाबत नोंद घेण्याचे काम जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात सुरू होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here