नंदुरबार जिल्ह्यातील राज्य आदर्श शिक्षक, ग्रेड मुख्याध्यापक कैलास लोहार कोरोणा योद्धा म्हणून सन्मानित

तळोदा (मिलिंद निकम) – नवनिर्माण सर्व समाज हितार्थ संस्था नंदुरबार यांच्या वतीने जगावर आलेल्या covid-19 कोरोना महामारीच्या संकटात उत्कृष्ट सामाजिक काम केल्याबद्दल राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री व आमदार विजयकुमार गावीत यांच्या हस्ते कोरोणा योद्धा म्हणून श्री कैलास लोहार सर ग्रेड मुख्याध्यापक तळोदा यांना सन्मानित करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री रवि भाऊ गोसावी व कोरोना योद्धा सन्मान समिती प्रमुख डॉ. माधव कदम सर तसेच प्रसिद्ध पत्रकार रणजित राजपूत यांच्या समक्ष हा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी श्री कैलास लोहार यांच्या कार्याबद्दल यथोचित माहिती कार्यक्रमात देण्यात आली व कोरोणा योद्धा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व तर त्यांचे अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here